![mesh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/mesh.gif) |
काही नवे मित्र जोडाल
मेष – स्वत:ला क्रिएटिव्ह कामात गुंतवून घ्या. काहीही न करता बसून राहण्याची आपली सवय मानसिक शांततेला घातक ठरू शकते. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. प्रेमसंबंधामध्ये बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुम्हाला कामाच्या ठिकाणी कंटाळा येईल, याला कदाचित तुमचा आळशीपणा कारणीभूत असेल. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर रागावलात, तर तुम्हाला तडक प्रत्युत्तर मिळेल, म्हणून थोडे शांत राहा.
लकी क्रमांक : ९
|
![rushabh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/rushabh.gif) |
आर्थिक फायदा मिळेल
वृषभ – आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. हुशारीने गुंतवणूक करा. कुटुंबाची आघाडी आनंदी आणि सुरळीत असणार नाही. जुजबी मतभेद झाल्याने प्रणयराधनाचा योग नाही. सुयोग्य कर्मचा-यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. अनेक असे विषय, प्रश्न उद्भवतील- ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. संयम आणि शांतता राखली तर प्रत्येक अडथळा पार करता येऊ शकेल.
लकी क्रमांक : ८
|
![mithun](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/mithun.gif) |
शांतपणे राहून पावले उचला
मिथुन – भरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. नातेवाइकांमुळे तुम्ही काहीसे त्रस्त व्हाल. परिस्थिती हाताळण्यासाठी शांतपणे राहून पावले उचला. घाईघाईत, तडकाफडकी निर्णय घेतला तर महागात पडू शकते. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. सहका-यांशी व्यवहार करताना चातुर्य वापरावे लागेल. वेगाने वाहन चालविणे टाळा. रस्त्यावरून जाताना धोका पत्करणे टाळा. तुमच्या जोडीदाराला एखादी बाब न सांगितल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. लकी क्रमांक : ६
|
![karak](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/karak.gif) |
गुंतवणूक काळजीपूर्वक करावी
कर्क – मानसिक, नैतिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षण घेणेही संपूर्ण विकासासाठी आवश्यक ठरते. सशक्त मन हेच सशक्त शरीरामध्ये वास करते. गुंतवणूक अतिशय काळजीपूर्वक करावी. कारण नसताना नुकसान होऊ नये, यासाठी योग्य सल्ला घेणे चांगले. घरातील सणांचे, उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल. खूप सुंदर सप्ताह आहे. कार्यालयातील वातावरण हे तुमच्याशी मैत्रीपूर्ण नसेल. प्रवासाच्या संधी शोधाल. सातत्याने विविध गोष्टींवर एकवाक्यता न झाल्याने तणाव वाढून त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण पडेल.
लकी क्रमांक : १
|
![singh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/singh.gif) |
प्रेम मिळविण्यात यशस्वी व्हाल
सिंह – आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज निर्माण होईल. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही, याची काळजी घ्या. तुमच्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ काढा. तुम्ही प्रेमात पोळून निघालात तरी हळूहळू प्रेम मिळविण्यात यशस्वी व्हाल. तुमचे वरिष्ठ किंवा सहका-यांनी तुम्हाला कितीही चिथविण्याचा प्रयत्न केला तरी बुद्धाप्रमाणे शांत राहा. झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल.
लकी क्रमांक : ८
|
![kanya](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/kanya.gif) |
अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाहीत
कन्या – आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला सप्ताह. तुमचे उल्हासित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. तुम्ही भागीदारांच्या/जोडीदारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले तर तो/ती असहनशील बनतील. या लोकांच्या भाऊगर्दीमध्ये तुम्ही नशीबवान आहात, हे तुम्हाला कळून चुकेल. कारण तुमचा/तुमची जोडीदार उत्तम आहे. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केलेत तर यश आणि मान्यता दोन्ही तुमच्याकडे चालत येईल. प्रवासासाठी फार काही चांगला नाही. जेव्हा तुमच्या जोडीदारासोबत भावनिक नातं घट्ट असतं तेव्हा शृंगार अधिक खुलतो.
लकी क्रमांक : ७
|
![tula](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/tula.gif) |
गुंतवणूक फायदेशीर ठरेल
तूळ – कुटुंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जाल. परंतु, तुमचा राग अनावर होऊ देण्याची गरज नाही. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल. ज्यावर उपाय करता येत नाही ते शांतपणे सहन करावे. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्ही आणि तुमचा संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. रेशमी धागे आणि टॉफी प्रिय व्यक्तीसोबत वाटण्याची शक्यता आहे. कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा. आपल्याला काय वाटते हे दुस-यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. तुमचा जोडीदार रिवाइंडचं बटण दाबणार आहे आणि तुमचं सुरुवातीच्या दिवसातलं प्रेम आणि रोमान्स जागा होणार आहे.
लकी क्रमांक : ९
|
![wrachik](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/wrachik.gif) |
कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल
वृश्चिक – आरोग्याच्या समस्या हस्तक्षेप करू शकतात. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. धूम्रपान सोडण्यासाठी तुमचा जोडीदार तुम्हाला प्रोत्साहन देईल. अन्य वाईट सवयी सोडण्यासाठीसुद्धा हीच योग्य वेळ आहे. हातोडा गरम असतो तेव्हाच वार करावा, हे लक्षात ठेवा. प्रिय व्यक्तीसोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाबद्दल कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान केला जाईल. अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खूश करण्याची अनेक कारणे आहेत. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील प्रियाराधन, पाठलाग, लाडीगोडी या सगळ्याच्या आठवणी जागवून तुम्ही ताजेतवाने व्हाल. लकी क्रमांक :२
|
![dhanu](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/dhanu.gif) |
शांतताभंग होईल
धनु- तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्ही कार्यालयात अतिरिक्त वेळ खर्च केलात, तर तुमच्या घरगुती जीवनावर परिणाम होईल. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कारण, त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतताभंग होईल. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळीत पार पडेल, पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच, तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात त्यावर उपाय योजू शकाल. निकटच्या सहका-यांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. तुमचे वैवाहिक आयुष्य चुकीच्या पद्धतीने तुमचे शेजारी तुमचे कुटुंबीय आणि नातेवाइकांपर्यंत पोहोचवतील.
लकी क्रमांक : ८
|
![mesh1](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/mesh1.gif) |
कामाची पद्धत तपासून पहा
मकर- प्रत्येक माणसांचे सांगणे ऐका. कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. आर्थिक अडचणींमुळे टीका आणि वादविवादाची परिस्थिती उद्भवेल. आपल्याकडून अतिअपेक्षा करणा-यांना नाही म्हणायची तयारी ठेवा. तुमच्या बायकोच्या कामकाज व्यवहारात तुम्ही हस्तक्षेप केल्याने ती अस्वस्थ होईल. गैरसमज टाळण्यासाठी हस्तक्षेप करण्यापूर्वी एकदा बायकोची परवानगी घ्या. मग तुम्ही सहजपणे समस्या टाळू शकाल. तुमची स्थिती काय आहे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला समजावून सांगण्यात तुम्हाला खूप अडचणी येतील. तुमचे सहकर्मचारी यांना तुम्ही काही विशिष्ट विषय ज्या पद्धतीने हाताळत आहात ते आवडणार नाही; परंतु ते तुम्हाला सांगू शकणार नाहीत. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम होत नसेल, तर तुमच्या कामाची पद्धत तपासून पाहा आणि त्यानुसार आवश्यक ते बदल तुमच्यात करा. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. नातेवाइकांमध्ये वादाची ठिणगी पडणे शक्य आहे.
लकी क्रमांक : ८
|
![kumbh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/kumbh.gif) |
खर्च अधिक होईल
कुंभ- ज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे. तुमच्या पैशामुळे अनेक समस्या निर्माण होतील. तुमचा खर्च खूप अधिक होईल किंवा तुमचे पाकीट हरवेल. निष्काळजीपणामुळे काही तोटा निश्चितपणे होईल. कर्मकांडे घरच्या घरीच करणे हिताचे ठरेल. भेटवस्तूचा उपयोग केल्यानेदेखील आपल्या प्रिय व्यक्तीचा मूड बदलू शकत नाही. केलेली गुंतवणूक लाभदायक असेल, पण आपल्या भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे. आपल्या मनातील विचार मांडण्यास कचरू नका. तुमचा/तुमची जोडीदार विचित्र वागेल, ज्यामुळे तुम्ही दुखावले जाण्याची शक्यता आहे.
लकी क्रमांक : ६
|
![meen](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/meen.gif) |
जोडीदाराशी गंभीर भांडण होईल
मीन – आपल्या जीवनसाथीबरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. गुंतवणूक करताना चढ-उतार खूप घातक ठरू शकतात, म्हणून पूर्ण काळजी घेऊन विचारांती गुंतवणूक करा. कौटुंबिक ताणतणाव दडपण गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने जितक्या लवकर त्यावर मार्ग काढता येईल तेवढय़ा लवकर मार्ग काढा. मतभेदांमुळे खासगी नातेसंबंधात फूट पडण्याची शक्यता आहे. एकदम निष्कर्ष काढाल आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल. तुमचे तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होईल.
लकी क्रमांक : ३
|