![mesh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/mesh.gif) |
रस्त्यावरून जाताना धोका
मेष – कुटुंबात वैद्यकीय खर्च निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कमिशन-लाभांश-किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे, हे जाणून घ्या. वेगाने वाहन चालविणे टाळा. रस्त्यावरून जाताना धोका पत्करणे टाळा. तुमचे असणे हे त्याच्या/तिच्यासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करेल.
लकी क्रमांक : ३
|
![rushabh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/rushabh.gif) |
अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताण-तणाव
वृषभ – ताण-तणावावर मात करण्यासाठी शांत आराम देणारे संगीत ऐका. गुंतवणूक करताना चढउतार खूप घातक ठरू शकतात, म्हणून पूर्ण काळजी घेऊन विचारांती गुंतवणूक करा. मित्रमंडळी आणि नातेवाइकांवर आपले निर्णय, मते लादू नका. कदाचित तुमच्या आवडीनुसार ते स्वीकारले जाणार नाहीत आणि ते विनाकारण नाराज होतील. तुम्ही प्रेम प्रदूषण पसरवाल. एखादा मित्र किंवा जुजबी ओळख असलेल्या व्यक्तीच्या स्वार्थी वागणुकीमुळे तुमची मन:शांती गमावून बसाल. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताण-तणाव वाढेल. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे!
लकी क्रमांक : ३
|
![mithun](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/mithun.gif) |
उत्सवाच्या वातावरणामुळे दडपण कमी
मिथुन – तंदुरुस्ती आणि वजन घटविण्याचे उपक्रम आपल्या शरीरास चांगला आकार देण्यासाठी उपयोगी ठरतील. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. घरातील सणांचे, उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. प्रणयराधना करण्याची भावना जोडिदाराकडून अनुभवता येईल. तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे, याचीही माहिती तुम्हाला मिळेल. हाती घेतलेले बांधकाम तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरीत्या पूर्ण होईल. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल, तर तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. लकी क्रमांक : १
|
![karak](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/karak.gif) |
आर्थिक स्थिती सुधारेल
कर्क – लहान मुलांबरोबर खेळण्यातून मौज मस्ती करणे हा आपल्या दु:खावर चांगला उपाय असेल. सप्ताहाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्ही सहभागी झालेल्या सोशल कार्यक्रमात तुम्ही आकर्षणबिंदू ठराल. कुणीतरी तुम्हाला शुभेच्छा देईल, अभिनंदन करील. व्यावसायिकांना चांगला सप्ताह अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. खासगी आणि गोपनीय माहिती कधीही उघड करू नका. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा प्रेमात पडाल, कारण तो/ती यासाठी खरंच लायक आहे.
लकी क्रमांक : ४
|
![singh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/singh.gif) |
सावधानता बाळगा
सिंह – अवघडेलपण, असुविधा तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात, पण मित्रांच्या भरपूर मदतीमुळे तुमच्या अडचणी दूर होतील. तणाव दूर घालविण्यासाठी एखादे छानसे संगीत ऐका. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. तुम्ही तुमच्या घरची कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जोडीदार वैतागून जाईल. सावधानता बाळगा, कोणीतरी तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करू शकते. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. तुमच्या जोडीदाराच्या एखाद्या कामामुळे तुम्ही अवघडले जाल, पण नंतर तुम्हाला जाणवेल जे झालं ते चांगल्यासाठीच होतं.
लकी क्रमांक : ३
|
![kanya](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/kanya.gif) |
कुटुंबीयांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संदेश द्या
कन्या – तुमची चिंता, काळजी मिटविण्याची आत्यंतिक गरज असणारा काळ आहे. आपली शारीरिक उत्साह तर त्यामुळे कमी होतोच, पण तुमचे आयुष्यदेखील कमी होते हे आपणास लक्षात घ्यावे लागेल. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. आपण आपल्या कुटुंबीयांची किती काळजी करता, हे त्यांना जाणवण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संदेश सतत देत राहा. त्यांच्याबरोबर आपला किमती वेळ घालवल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित होईल. तुम्ही एखाद्याचे हृदय तुटण्यापासून वाचवाल. करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वत:ला गुंतवून घ्या. अडचणी आल्या की, चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल.
लकी क्रमांक : ५
|
![tula](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/tula.gif) |
खर्च वाढतील, पण उत्पन्नही वाढेल
तूळ – दिवसभराच्या कामात आरोग्याच्या समस्या हस्तक्षेप करू शकतात. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. एखादी जुनी ओळख तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकते. अनपेक्षित प्रियाराधन करण्याकडे कल राहील. तुमच्या वर्चस्वशाली दृष्टिकोनामुळे सहका-यांकडून टीका होईल. वेगाने वाहन चालविणे टाळा. रस्त्यावरून जाताना धोका पत्करणे टाळा. तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल.
लकी क्रमांक : ३
|
![wrachik](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/wrachik.gif) |
नवीन मित्र जोडाल
वृश्चिक – ताणतणाव, दडपण टाळा कारण, त्यांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणा-या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. तुमचा मनमोहक स्वभाव आणि आनंदी व्यक्तिमत्त्व यामुळे तुम्ही नवीन मित्र जोडाल आणि त्यांच्याशी संपर्क वाढवाल. वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्हाला विसरावे लागेल. निर्णय घेताना अहंकार, स्वाभिमान मध्ये येऊ देऊ नका, इतरांना काय म्हणायचे आहे तेदेखील ऐका. तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल. लकी क्रमांक : ५
|
![dhanu](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/dhanu.gif) |
वैवाहिक आयुष्य खडतर
धनु- तुमची ऊर्जापातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. चढ-उतारांमुळे फायदा होईल. पूर्वजांच्या संपत्तीचे उत्तराधिकारी होण्याची बातमी संपूर्ण कुटुंबाला आनंद देईल. आपल्या प्रिय व्यक्तीच्या मूडमधील बदल अनेक हेलकावे खाणारा असेल. डोळे कधीच खोटं बोलत नाहीत आणि तुमच्या जोडीदाराचे डोळे तुम्हाला काहीतरी विशेष सांगणार आहेत. आपल्या प्लॅनमध्ये शेवटच्या क्षणी बदल होण्याची शक्यता असणारा सप्ताह तुमचे वैवाहिक आयुष्य खडतर काळातून जाण्याची शक्यता आहे.
लकी क्रमांक : २
|
![mesh1](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/mesh1.gif) |
कामाच्या ठिकाणी कष्टाचे चीज होणार
मकर- आणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल, पण त्याच वेळी भीतीपोटी, चिंतेमुळे निर्माण होणा-या द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा. अनपेक्षितरीत्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. नव्या घटनांवर लक्ष केंद्रित करा, आपल्या मित्रांकडून मदत मिळवा. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात, त्यांचे चीज होणार आहे. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा सप्ताह साडेसाती चालू आहे.
लकी क्रमांक : ३
|
![kumbh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/kumbh.gif) |
नातेसंबंधात फूट पडण्याची शक्यता
कुंभ- तुमच्या निराशावादी दृष्टिकोनामुळे तुम्ही कोणतीही प्रगती करू शकणार नाही. चिंता करण्याच्या प्रवृत्तीमुळे तुमची विचारशक्ती मंदावली आहे, हे ओळखण्याची हीच खरी वेळ आहे. उजळ बाजूकडे पाहा आणि त्यामुळे तुमच्या निर्णयात बदल करा. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. तुमचे प्रियजन आनंदी झाले असतील तर त्यांच्यासोबत संध्याकाळी मौजमजा करण्याचे बेत ठरवा. मतभेदांमुळे खासगी नातेसंबंधात फूट पडण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रेमाने भरलेले वातावरण राहील. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. सप्ताह चांगला जावा असं वाटत असेल तर तुमच्या जोडीदाराचा मूड ऑफ असताना तोंडातून चकार शब्दही काढू नका.
लकी क्रमांक : ९
|
![meen](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/meen.gif) |
नव्या कामातून अपेक्षापूर्ती
मीन – कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आणि भविष्याची योग्य योजना करण्याची गरज आहे. प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाल टिकणारा असेल. हाती घेतलेल्या नव्या कामातून अपेक्षापूर्ती होण्याची कमी शक्यता आहे. तुमची संवाद कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. कोणा तिस-याने कान फुंकल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल, पण तुमच्या प्रेमामुळे सर्व काही ठीक होईल.
लकी क्रमांक : ७
|