बिहारमधल्या मोठया विजयाबद्दल विविध पक्षाच्या नेत्यांनी बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे अभिनंदन केले आहे. बिहारमधील धर्मनिरपेक्ष महाआघाडीच्या विजयाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ऐतिहासिक म्हटले आहे.
पाटणा – बिहारमधल्या मोठया विजयाबद्दल विविध पक्षाच्या नेत्यांनी बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे अभिनंदन केले आहे. बिहारमधील धर्मनिरपेक्ष महाआघाडीच्या विजयाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ऐतिहासिक म्हटले आहे.
लाईव्ह निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऐतिहासिक विजयाबद्दल नितीशजी तुमचे खूप खूप अभिनंदन असे टि्वट केजरीवालांनी केले आहे. निवडणुकीच्या काळातही अरविंद केजरीवाल यांनी जाहीरपणे नितीश कुमारांचे समर्थन केले होते. त्यांनी मतदानाच्या प्रत्येक टप्प्याआधी टि्वटरवरुन बिहारच्या जनतेला नितीश कुमार यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते.
बिहारमधील भाजपाच्या पराभवाने शिवसेनेला बळ दिले आहे. केंद्रात आणि राज्यात सातत्याने भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणा-या शिवसेनेने नितीश कुमार यांचे कौतुक केले आहे. आम्ही नितीश कुमारांचे अभिनंदन करतो. बिहारचा निकाल हा देशाच्या राजकीय भविष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे. नितीश कुमार राजकीय हिरो ठरले आहेत अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी नितीश कुमारांचे अभिनंदन केले.
नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्लाह यांनीही नितीश कुमारांचे अभिनंदन केले आहे. तुम्ही या विजयासाठी योग्य आणि पात्र होता. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा विजय हा नेत्याचा असतो. पराभव हा पक्षाचा असतो. विजयाबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन.
काँग्रेस नेते अहमद पटेल यांनीही नितीश कुमारांचे अभिनंदन केले. “वेल डन बिहार” जदयू, राजद, काँग्रेस नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन. एनडीएने चुकीचे दावे केले होते. त्यांच्या पराभवासाठी तिन्ही पक्षांनी मिळून भरपूर मेहनत घेतली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या विजयाला सहिष्णू, असहिष्णूतेची जोड दिली आहे. नितीशकुमार, लालूजी तुमचे आणि तुमच्या पूर्ण टीमचे अभिनंदन. बिहारच्या माझ्या बंधु-भगिनींचेही अभिनंदन. हा सहिष्णूतेचा विजय आहे आणि असहिष्णूतेचा पराभव.
इस एतिहासिक जीत के लिए बहुत बहुत बधाई हो नीतीश जी
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) November 8, 2015
Heartiest congratulations on a well deserved victory @NitishKumar sahib. Your victory will prove critical for the nation in the days ahead.
— Omar Abdullah (@abdullah_omar) November 8, 2015
Well done Bihar Congratulations to leadership and workers of Congress,RJD & JDU.They have worked hard to defeat the false claims of NDA
— Ahmed Patel (@ahmedpatel)
Congratulations @NitishKumar ji, Lalu ji & your full team. And all my Bihar brothers & sisters. Victory of tolerance, defeat of intolerance
— Mamata Banerjee (@MamataOfficial) November 8, 2015