मुंबई सेंट्रल बसस्थानका समोरच्या समुद्राबारवर गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी कारवाई केली.
मुंबई – मुंबई सेंट्रल बसस्थानका समोरच्या समुद्राबारवर गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी कारवाई केली. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली या बारमध्ये अश्लील नृत्य आणि देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती.
पोलिसांनी मध्यरात्री बारवर धाड टाकली तेव्हा बारमध्ये अश्लील नृत्य सुरु होते. पोलिसांनी सतरा मुलींसह अन्य २७ जणांना अटक केली. यामध्ये ग्राहक आणि वेटरचा समावेश आहे. एका स्वयंसेवी संस्थेने या बारमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना दिली होती.
पोलिसांनी आधी स्वत:हा साध्या वेशात बारमध्ये जाऊन या सर्व आरोपांची खातरजमा करुन घेतली आणि नंतर ही कारवाई केली. पोलिसांनी छापा टाकल्याचे समजतचा समुद्राबारचा मालक फरार झाला आहे. महाराष्ट्रात डान्सबारवर बंदी असल्यामुळे, काही ठिकाणी ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली अश्लील नृत्यासह देहविक्रीचा व्यवसाय चालतो. कायद्याने बंदी असल्यामुळे महाराष्ट्रात आजही अनेक ठिकाणी लपून-छपून डान्सबार सुरु आहेत.