पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या घरावर मोर्चा काढण्यासाठी गेलेल्या अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या ७० समर्थकांना दिल्ली पोलीसांनी ताब्यात घेतलं.
नवी दिल्ली – पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या घरावर मोर्चा काढण्यासाठी गेलेल्या अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या ७० समर्थकांना दिल्ली पोलीसांनी ताब्यात घेतलं. केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांच्या राजीनाम्याची मागणी कऱण्यासाठी गेलेल्या केजरीवाल यांच्या मोर्चा त्यामुळे फसला आहे. दरम्यान, या घटनेनंतर आंदोलकांनी बेमुदत काळापर्यंत संपाचा इशारा दिला आहे. तर पंतप्रधानांची भेट होईपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचं केजरीवाल यांनी स्पष्ट केल.