डोंबिवलीतही शिवसेना शाखेची स्थापना २० जुलै १९६६ रोजी झाली. गो. ल. मोकाशी पहिले शाखाप्रमुख होते.
डोंबिवली – डोंबिवलीतही शिवसेना शाखेची स्थापना २० जुलै १९६६ रोजी झाली. गो. ल. मोकाशी पहिले शाखाप्रमुख होते. मराठी माणसाच्या हिताच्या दृष्टीने स. गो. बर्वे या प्रशासकीय अधिका-याच्या अनुभवाचा फायदा जनतेला व्हावा, म्हणून शिवसेनेने त्यांना खासदारकीसाठी पाठिंबा दिला. लोकसभेत त्यांची निवड झाली, परंतु त्यांचे निधन झाले. त्यांच्या जागेवर ताराबाई सप्रे या त्यांच्या भगिनीला काँग्रेसने तिकीट दिले. त्याही ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या. १९६९ साली जनरल करिअप्पा या ज्येष्ठ सेनानीच्या उमेदवारीस शिवसेनेने लोकसभेच्या निवडणुकीसाठी पाठिंबा दिला. त्यावेळी त्यांच्या प्रचारासाठी नेहरू मैदानात बाळासाहेब ठाकरे यांची प्रचंड जाहीर सभा झाली. बाळासाहेबांची डोंबिवलीतील ही पहिलीच मोठी सभा झाली होती. १९७१ साली विजय विचारे, अशोक अचलकर, रवींद्र सहस्र्बुद्धे, रमेश खरे, शशिकांत ठोसर, शरद अमोणकर यांच्या सक्रिय पुढाकाराने शिवसेनेचे कार्य विविध क्षेत्रांत पसरले. १९७४ मध्ये डोंबिवली नगरपालिकेची निवडणूक शिवसेनेने प्रथमच लढवली आणि शिवसेनेचे शशिकांत ठोसर, माधव भावे, प्रमोद वाशाळकर हे तीन नगरसेवक निवडून आले. शिवसेनेने मांडलेल्या ठरावामुळेच डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानाचे नामकरण कान्होजी जेधे मैदान करण्यात आले. डोंबिवलीत पहिली सार्वजनिक रुग्णवाहिका १९८२ साली शिवसेनेतर्फे सुरू करण्यात आली. तिचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर १९८७ साली दुसरी रुग्णवाहिका डोंबिवली पश्चिमेत सुरू करण्यात आली. तिचेही उद्घाटन बाळासाहेबांच्या हस्ते कान्होजी जेधे मैदानात झाले. त्यावेळी मैदानही अपुरे पडले होते. ज्या-ज्या वेळी बाळासाहेब डोंबिवलीत आले, त्या त्यावेळी त्यांच्या सभांना खूपच गर्दी होत असे. शहरातील मैदानेही बाळासाहेबांच्या लोकप्रियतेपुढे तोकडी पडत