शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकऱणी पश्चिम बंगालचे मंत्री मदन मित्रा यांना अटक केल्याच्या निषेधार्ख तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी संसदेबाहेर जोरदार निदर्शने केली.
नवी दिल्ली – शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकऱणी पश्चिम बंगालचे मंत्री मदन मित्रा यांना अटक केल्याच्या निषेधार्ख तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी संसदेबाहेर जोरदार निदर्शने केली.
‘PM, Amit Shah Bengal is angry’ अशा प्रकारचे फलकही त्यांनी यावेळी दाखवले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्याशी हस्तांदोलन करत असल्याचा फोटोही काही खासदारांनी दाखवला.
सहारा समूहाच्या कार्यालयावर छापे मारले होते. त्यावेळी सापडलेल्या डायरीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचेही नाव असल्याचा आरोप तृणमूल खासदारांनी केला. मात्र भाजपने हा आरोप फेटाळून लावला आहे. दरम्यान हा मुद्दा संसदेच्या दोन्ही सभागृहात उपस्थित करणार असल्याचे या खासदारांनी सांगितले. तसेच केंद्राकडून सीबीआयचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोपही यावेळी तृणमूलच्या खासदारानी केला.
शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी शुक्रवीरी सीबीआयने क्रीडा आणि वाहतूक मंत्री मदन मित्रा यांना अटक केली. या अटकेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर जोरदार टीका केली.