संसदेत गोंधळ घालून राजकीय हेतूने कामकाज ठप्प करणा-या खासदारांविरोधात आता उद्योगजगताने ऑनलाईन स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे.
नवी दिल्ली- संसदेत गोंधळ घालून राजकीय हेतूने कामकाज ठप्प करणा-या खासदारांविरोधात आता उद्योगजगताने ऑनलाईन स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे.
राहुल बजाज, आदि गोदरेज आणि किरण मुझुमदार-शॉ यांच्यासह १७,००० व्यक्तींनी या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदवून संसदेतील कोंडी फोडण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
महत्त्वाच्या सुधारणा संमत करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी समन्वयाची भूमिका घेऊन चर्चा करावी अशी मागणी यातून करण्यात आली आहे.
भारतीय उद्योग महासंघाने पाच दिवसांपूर्वी सुरू केलेल्या या मोहिमेत इन्फोसिस सहसंस्थापक क्रिस गोपालकृष्ण, गोदरेज समूह आदि गोदरेज, बजाज ऑटोचे अध्यक्ष राहुल बजाज, हिरो समूहाचे सुनील कांत मुंजाल आणि पवन मुंजाल तसेच बायोकॉनच्या व्यवस्थापकीय संचालक किरण मुझुमदार-शॉ यांनी स्वाक्षरी केली. याआधी १७,०००पेक्षा जास्त व्यक्तींनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.