संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी होणा-या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली- संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी होणा-या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सूत्राकड़ून मिळालेल्या माहितीनुसार पर्रिकर यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे.
पर्रिकर यांनी बुधवारी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट घेण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात होणा-या समावेशाबद्दल मोदींच्या भेटीनंतरच आपण काही प्रतिक्रिया देऊ शकू असे पर्रिकर यांनी पत्रकारांना सांगितले.
शहा यांना भेटण्यासाठी पर्रिकर यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द केली. या बैठकीत खाण परवान्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार होता.