भारताचे माजी कर्णधार संदीप पाटील यांचा मुलगा चिराग लवकरच ‘येक नंबर’ या मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.
पणजी – भारताचे माजी कर्णधार संदीप पाटील यांचा मुलगा चिराग लवकरच ‘येक नंबर’ या मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.
या कार्यक्रमात तो एका रावडी मुलाची भूमिका करत आहे. मात्र चिरागचा स्वभाव मृदूभाषिक असल्याने या भूमिकेसाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागली.
गुरु पोर्णिमा आणि भारतीय या सिनेमांचे दिग्दर्शक गिरीश मोहिते यांची ही मालिका आहे. येत्या २२ जूनपासून स्टार प्रवाहवर ही मालिका सुरु होणार आहे.
अनेक तरुण कलाकारांमधून चिरागची निवड करण्यात आली. तो या भूमिकेसाठी योग्य होता, असे मोहिते म्हणाले येक नंबर ही देव आणि वेदाची प्रेम कहाणी आहे.