मुंबई १९९३ साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्त याला सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
नवी दिल्ली- मुंबई १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्त याला सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात झाली. बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी याकूब मेमनला टाडा न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. तर अन्य १० जणांच्या फाशीची शिक्षा रद्द करुन त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
अभिनेता संजय दत्त याला सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. संजयने याआधीच १८ महिन्यांची शिक्षा भोगली आहे. त्यामुळे आता त्याला साडे तीन वर्षांसाठी तुरुंगात जावे लागणार आहे.
… ‘तो’ भीषण दिवस
दुस-या महायुध्दानंतर सर्वाधिक आरडीएक्सचा वापर
टाडा न्यायालयाने संजय दत्तला सहा वर्षांची शिक्षा ठोठावली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने संजयची शिक्षा एक वर्षाने कमी करून त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. संजयला चार आठवड्यांच्या आत शरणागती पत्करावी लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
बॉम्बस्फोटात सहभाग असल्याच्या गंभीर आरोपातून संजयची मुक्तता करण्यात आली होती. मात्र, एके ५६ बंदूक बाळगल्याबद्दल त्याला नोव्हेंबर २००६ साली दोषी ठरवण्यात आले होते.
‘त्या स्प्रिंगमुळे संजूबाबा अडकला’
या स्फोटांसाठी वापरलेल्या शस्त्रसाठ्यापैकी काही शस्त्रे अभिनेता संजय दत्त याच्याकडे ठेवण्यात आल्याचे पोलिस तपासात पुढे आले. मॅग्नम व्हिडीओचा मालक व संजय दत्तचा मित्र हनिफ कडावाला याने हा साठा त्याच्याकडे ठेवला होता. मात्र, आपल्याकडे असलेल्या शस्त्रांची माहिती पोलिसांना समजल्याची माहिती मिळताच संजय दत्तने त्याचा मित्र युसूफ नळवाला याला या शस्त्रांची विल्हेवाट लावण्यास सांगितले. नंतर युसूफने संजय दत्तच्या घरात ठेवलेली एके-५६ रायफल केरसी जेनिया या फॅब्रिकेटरला वितळवण्यासाठी दिले. मात्र केरसीने त्यातील एक स्प्रिंग काढून स्वतःकडे ठेवली. याच स्प्रिंगने संजय दत्तला तुरुंगात धाडले.
सुरुवातीला मला काहीच माहिती नाही असे सांगणा-या संजय दत्तने नंतर शस्त्रे घरात लपवून ठेवल्याची कबुली दिली. मात्र, त्याला बॉम्बस्फोटाच्या कटाबद्दल काहीही माहिती नव्हती. स्वतःच्या सुरक्षेसाठी म्हणून त्याने ही रायफल बाळगली होती. त्यामुळेच त्याला शस्त्रास्त्र कायद्याखाली अटक करण्यात आली.
[EPSB]
संजय दत्तच्या शिक्षेने बॉलिवुडचे धाबे दणाणले
मुंबई १९९३ साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात बॉलिवुड अभिनेता संजय दत्तला सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षांसाठी कारावासाची शिक्षा कायम केल्यामुळे बॉलिवुडचे धाबे दणाणले आहे.
मुंबई १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी याकूब मेमनची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.
[/EPSB]