राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबरच आमचा ‘इसिस’लाही विरोध आहे. कारण या दोन्ही संघटना समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात.
नवी दिल्ली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबरच आमचा ‘इसिस’लाही विरोध आहे. कारण या दोन्ही संघटना समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. मुस्लीम हे इसिस व संघ परिवाराचा विरोध करतात, असे वक्तव्य कॉँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी केले.‘जमात उलमा ए- हिंद’ या संस्थेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकात्मता परिसंवादात ते बोलत होते.
यावेळी कॉँग्रेस नेते मणिशंकर अय्यर, विविध धर्माचे धर्मगुरू उपस्थित होते. ते म्हणाले की, आम्ही ‘इसिस’ला विरोध करतो, त्याच पद्धतीने आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध करतो. देशातील सर्व जातीयवाद्यांच्या विरोधात लढा देणे गरजेचे आहे. या जातीयवाद्यांचा सामना करण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष फौजांनी एकत्रित येणे आवश्यक आहे. भारत हा सर्वधर्मीयांचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दादरी घटनेनंतर हिंदी पत्रकार आणि लेखकांनी सर्वधर्मसमभावाविरोधात जोरदार लढा दिला. १८५७ पासून मुस्लीम मौलवी व उलेमा हे स्वातंत्र्यलढय़ात सहभागी होत आहेत.