बॉलीवूड अभिनेत्री आलिया भटच्या उजव्या खांद्याला चित्रीकरणादरम्यान दुखापत झाली आहे.
मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री आलिया भटच्या उजव्या खांद्याला चित्रीकरणादरम्यान दुखापत झाली आहे.
आलियाच्या आगामी ‘कपूर अँन्ड सन’ या चित्रपटाचे चित्रीकरण तामिळनाडूमधील कुनूर येथे सुरू आहे. या चित्रीकरणादरम्यान तिला ही दुखापत झाली. येत्या पंधरा दिवसात आपण या दुखापतीतून सावरू, अशी आशा आलियाने व्यक्त केली आहे.
‘तुम्ही दिलेल्या शुभेच्छाबद्दल धन्यवाद.. दुखापत इतकी काही गंभीर नाही आहे. पुढील दोन आठवड्यात मी या दुखापतीतून सावरेन’, असे आलियाने ट्विटरवर म्हटले आहे. आलियाची आई सोनी रझदान यांनीही ट्विटरवरुन आलियाच्या सर्व चाहत्याचे आभार मानले.
आलिया लवकरच विकास बहलच्या ‘शानदार’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. या चित्रपटात शाहीद कपूरचीही भूमिका आहे.
Thank you all for your wishes.. Shoulder injury at an early stage.. No stress I shall be fit and fine in 2 weeks!!! Time to become a lefty;)
— Alia Bhatt (@aliaa08)