राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना रविवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्यातील रूबी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना रविवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्यातील रूबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुबी रुग्णालयाचे संचालक डॉ. परवेज ग्रँट यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने पवारांच्या वेगवेगळय़ा तपासण्या केल्या. आता पवारांची प्रकृती ठीक असून सोमवारी त्यांना घरी सोडण्यात येईल, अशी माहिती डॉ. परवेझ ग्रँट यांनी दिली.
थकव्यामुळे अशक्तपणा जाणवू लागला होता. त्यामुळे पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीची काळजी करण्याचे कारण नाही ते उद्या मुंबईला येत आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे अंकुश काकडे यांनी दिली.