किडनीच्या त्रासामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रविवारी रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुणे- किडनीच्या त्रासामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रविवारी रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले. काळजी करण्यासारखे काहीही नाही. पवार यांची प्रकृती चांगली आहे. ते दोन-तीन दिवस रुग्णालयात राहतील, अशी माहिती रुग्णालयाचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट यांनी दिली.
डॉ. परवेझ ग्रँट यांच्या देखरेखीखाली पवार यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉ. ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या प्रकृतीची काळजी करण्याचे कारण नाही.
दोन तीन दिवस त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज नाही; मात्र त्यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे, असे डॉ. ग्रँट यांनी सांगितले.