घराला नवीन रुपडं द्यायचं असेल तर अनेक व्याप करायला लागतात. रंग देणे, फर्निचरची अदलाबदल करणे.. आणि बरंच काही. पण या सगळ्या व्यापातून बचाव हवा असेल तर वॉलग्राफिक्सचा पर्याय उत्तम आहे. कारण तो आकर्षक तर आहेच, त्याहीपेक्षा सोयीस्कर आहे.
तुमच्या घराला नावीण्यपूर्ण बनवण्यासाठी जुन्या जागेमध्ये जिवंतपणा निर्माण करावा लागतो. परंतु हे करीत असताना सर्वात मोठी अडचण असते ती म्हणजे घराला नवे रूप मिळवून देण्यासाठी करावे लागणारे अनेक व्याप. यासाठी केवळ भिंतींना रंग देणं पुरेसं ठरू शकत नाही.
ऑटोमोटिव्ह म्हणजेच वाहनांच्या सजावटीसाठी उच्च दर्जा आणि नावीण्यपूर्ण डिझाईन्स तयार करणा-या ‘क्लासिक स्ट्राईप्स’ या कंपनीने आता तुमच्या भिंतींच्या सजावटीसाठी ‘वॉलग्राफिक्स’ हे उत्पादन आणलं आहे. हे उत्पादन केवळ सोयीस्करच नाही तर अतिशय आकर्षकदेखील आहे. ऑटोग्राफिक्सच्या माध्यमातून (हा ब्रँड गेल्या दशकभरापासून त्याच्या श्रेणीत आघाडीवर आहे.)ऑटोमोटिव्हमधील यशानंतर आता कंपनीने लोकांच्या घरांमध्येही प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना नावीण्यपूर्ण पद्धतीने घराची सजावट करणे आवडते.
चिकटवण्यासाठी किंवा काढण्यासाठी सुलभ
भिंतीवर लावण्याची ही ग्राफिक्स अतिशय उच्च दर्जाच्या मटेरियलपासून बनवण्यात येतात. त्यामुळे तुम्हाला ती ग्राफिक्स काढून टाकायची असतील तर योग्य पद्धतीने काढता येतात. भिंतीच्या रंगावर कोणताही परिणाम होऊ शकत नाही. त्यामुळे ग्राफिक्स काढून टाकल्यावर तुम्हाला भिंतीवर चिकट पदार्थाची किंवा ती जागा नव्याने रंगवण्याची चिंता उरत नाही. त्यामुळे तुम्ही हव्या तितका वेळ वॉलग्राफिक्स बदलून भिंतीचा लूकही बदलू शकता. मग पुढे या आणि तुमच्या कल्पनाशक्तीला वाव द्या. रंगकाम ही संकल्पनाच आता कालबाह्य झाली आहे.
हे काम स्वत:च करा
वॉलग्राफिक्सच्या भिंतीसाठी बनवण्यात आलेल्या सुंदर श्रेणीतील ग्राफिक्सचा वापर करून तुमचं घर सुंदर बनवा. यातील सर्वात चांगली गोष्ट आहे ती म्हणजे, ‘डीआयवाय’ म्हणजेच (‘डू इट युवरसेल्फ’) याचा अर्थ वॉलग्राफिक्स तुम्ही स्वत:च चिकटवू शकता. त्यामुळे हे काम करण्यासाठी डिझायनर शोधायचा तुमचा त्रास वाचणार आहे. फक्त आवडीचे डिझाईन निवडा, त्याची स्टीकर पट्टी काढा आणि भिंतीवर चिकटवा. आता तुमची भिंत नवीन स्टायलीश अवतारात तयार झाली आहे. तेही कोणत्याही गोंधळाशिवाय, नवीन रंगाच्या वासाशिवाय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील फíनचरची जागा बदलल्याशिवाय. वॉलग्राफिक्सचा फायदा म्हणजे ते कधीही काढून टाकता येतात. तसंच भिंती, दरवाजे, फरशी, छत यांसारख्या कोणत्याही गुळगुळीत पृष्ठभागावर चिकटवता येतात. मग पुढे या आणि तुमच्यातील कलाकाराला बाहेर येऊ द्या आणि घराला एक कलेचे स्वरूप द्या.
कलेला जिवंत बनवते
वापरण्यास अगदी सोयीस्कर असण्याबरोबरच वॉलग्राफिक्स तुम्हाला डिझाईनची एक अप्रतिम श्रेणी उपलब्ध करून देते, जी एकमेवाद्वितीय अशाच स्वरूपाची आहे. अतिशय सर्जनशील लूक असणा-या वॉलग्राफिक्सचा पार्श्वभाग पारदर्शक असून त्याला आऊटलाईन किंवा पॅचेसचा अवशेषही दिसत नाही. त्यामुळे हे चिकटवल्यानंतर भिंतीला एक चमकदारपणा आल्याशिवाय राहत नाही. याशिवाय वॉलग्राफिक्सचा थ्रीडी लूक पाहणा-याला मंत्रमुग्ध केल्याशिवाय राहत नाही. यामधील बटरफ्लाय पॅटर्न तुमच्या खोलीला एक अद्भुत शांतता मिळवून देतो. सेल डिझाईनच्या माध्यमातून घरामधील वातावरण अगदी स्वप्नवत बनू शकते. इतकंच नव्हे तर भिंतीवरून चालत जाणारे हत्ती किंवा हेडफोनची वॉलग्राफिक्स जोडी तुमच्या भिंतीला एक मजेदार रूप मिळवून देतात.
ही तर केवळ सुरुवात आहे. आणखी अनेक नवीन डिझाईन तयार करण्याची कंपनीची योजना आहे. इतकंच नव्हे तर लवकरच एक ई-कॉमर्स वेबसाईट तयार करून तुम्ही घरबसल्या शेकडो आकर्षक पॅटर्नमधून आपणास हवी असणारी डिझाईन निवडू शकाल. क्लासिक स्ट्राईप्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल आनंद सांगतात की, ‘आतापर्यंत वाहनांवरील आकर्षक डिझाईनसाठी आम्ही ओळखले जात होतो.
आता वॉलग्राफिक्सच्या माध्यमातून तोच विश्वास घराच्या सजावटीबाबत मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत. वॉलग्राफिक्सच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना अतिशय सोयीस्कर असा अनुभव अगदी किफायतशीर दरात उपलब्ध करून देणार आहोत. ग्राहकाची गरज आणि सोय यांचा विचार करून आणि आमची ग्राहकाप्रती बांधिलकी आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही उत्पादनाचा प्रारंभ केला आहे.’’
ऑनलाईन उपलब्धता : www.autographix.com