आपल्या वृद्ध आई-वडिलांना न सांभाळणा-या मुलांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येईल.
भोपाळ- आपल्या वृद्ध आई-वडिलांना न सांभाळणा-या मुलांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येईल. प्रसंगी त्यांना तुरुंगाची हवाही खावी लागेल असा इशारा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिला आहे. याबाबत लवकरच सरकार कायदा आणण्याच्या विचारात असल्याचेही त्यांनी सांगितले.
एका कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरून ते बोलत होते. लहानाचे मोठे होण्यापर्यंत आपल्याला सांभाळणा-या मात्या-पित्याकडे त्यांच्या वृद्धापकाळात दुर्लक्ष करणारे अनेकजण समाजात पाहायला मिळतात. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
अशा घटनांकडे घरगुती कारणे सांगून समाजाकडून याकडे ब-याचदा दुर्लक्ष केले जाते. काही टोकाच्या घटनांमध्ये वृद्ध माता-पित्यांना आपल्या मुलांविरोधातच पोलिसांची मदत घ्यावी लागते. मात्र, हा प्रश्न सोडवण्यासाठी अद्याप सक्षम कायदेही अस्तित्वात नाहीत. त्यामुळे त्यांची कुचंबणा होते.