पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात मार्च 2013 पर्यंत 35 नव्या लोकल ट्रेन दाखल होणार असून, यातील काही लोकल विरार-डहाणू या मार्गावर चालवल्या जाणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरद चंद्रायन यांनी दिली.
विरार – पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात मार्च 2013 पर्यंत 35 नव्या लोकल ट्रेन दाखल होणार असून, यातील काही लोकल विरार-डहाणू या मार्गावर चालवल्या जाणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरद चंद्रायन यांनी दिली.
चर्चगेट ते डहाणू लोकल सेवा सुरू करण्यासाठी वसई-विरार पालिकेचे नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या बाबत रेल्वे प्रशासनाने भूमिका स्पष्ट करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने सुचवले होते. त्यावेळी विरार-डहाणू लोकल सुरू करण्यात येईल, असे आश्वासन पश्चिम रेल्वेने न्यायालयात दिले होते. त्यानंतर चर्चगेट-डहाणू लोकल सेवा सुरू करण्याविषयीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केल्यामुळे या बाबतची याचिका मागे घेण्यात आली होती.