आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन रिक्षामधून जाणा-या प्रवासी महिलेची दागिन्यांची बॅग मोटरसायकलस्वारांनी हिसकावून नेल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला.
मुंबई- मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन देशांतर्गत विमानतळावर रिक्षामधून जाणा-या प्रवासी महिलेची दागिन्यांची बॅग हिसकावून नेल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. या बॅगेत १२ लाख रुपयांचे दागिणे आणि ३० हजार रुपये रोख ठेवले होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमाली साभेरवाल ही गोव्याची महिला गोवा येथून भोपाळ येथे दिवाळी साजरी करण्यासाठी निघाली होती. सोमाली यांनी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन देशांतर्गत विमानतळावर जाण्यासाठी रिक्षा केली. या रिक्षामधून विमानतळाकडे जात असताना मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांनी या महिलेकडील बॅग हिसकावून ते पसार झाले.
याप्रकरणी विले पारले पूर्व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.