राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील सदस्य आणि शिवसंग्राम सेनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील सदस्य आणि शिवसंग्राम सेनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. मेटे यांनी नुकत्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून बीड मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मेटे यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने मेटे यांची आमदारकी रद्द करण्याची नोटीस दिली होती. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
मेटे यांची आमदारकी १३ ऑक्टोबर पासून रद्द करण्यात आल्याचे विधान भवन सचिव अनंत कळसे यांनी सांगितले. त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायदा १९८६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
विधान परिषदेतील मेटे यांची मुदत सात जुलै २०१६ रोजी संपणार होती. मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेना-भाजप यांच्या महायुतीमध्ये प्रवेश केला होता. निवडणुकीच्या आधी भाजप-सेना यांच्यातील युती तुटल्यानंतर मेटे भाजप सोबतच राहिले.