मराठी चित्रपट असो किंवा हिंदी चित्रपट; कलाकारांना वेगवेगळय़ा भूमिका पार पाडाव्याच लागतात.
मराठी चित्रपट असो किंवा हिंदी चित्रपट; कलाकारांना वेगवेगळय़ा भूमिका पार पाडाव्याच लागतात. काही अभिनेत्यांनी मुलीच्या तर अभिनेत्रींना मुलाच्या रूपातल्या भूमिका साकारल्याची उदाहरणे आहेत. आपल्याला हे सर्व काही आता नवीन नाही. म्हणजे ‘अपना सपना मनी मनी’ या चित्रपटात आपण रितेश देशमुखला मुलीच्या रूपातली भूमिका करताना पाहिलं. अशा प्रकारे अनेक चित्रपटांत कलाकारांनी वेगवेगळय़ा भूमिका केल्या आहेत. पण आता इथे तर चक्क विद्या बालन आपल्याला जासूसगिरी करताना दिसणार आहे.
विशेष म्हणजे समर शेख याच्या ‘बॉबी जासूसगिरी’ या चित्रपटात विद्या आपल्याला वेगवेगळय़ा शंभर भूमिकांत दिसणार आहे. कधी ज्योतिषाच्या तर कधी भिका-याच्या रूपात या चित्रपटात ती जासूसगिरी करणार आहे. दाढी, मिशी, डोक्यावर फेटा, लुंगी अशा वेशातील विद्या आपल्याला खरं तर ओळखूही येणार नाही. ‘डर्टी पिक्चर’नंतर ‘कहानी’, ‘घनचक्कर’, ‘शादी के साइड इफेक्ट्स’ या चित्रपटांत तिने वेगवेगळय़ा भूमिका साकारल्या, मात्र ‘बॉबी जासूसगिरी’ या चित्रपटातील तिच्या भूमिका याहूनही हटके असतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. चार जुलैला तिचा हा चित्रपट प्रदर्शित होईल.