भारताचा अव्वल बॉक्सर विजेंदर सिंगला (७५ किलो) जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत दुस-याच फेरीत शनिवारी पराभवाचा धक्का बसला.
अल्माटी – भारताचा अव्वल बॉक्सर विजेंदर सिंगला (७५ किलो) जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत दुस-याच फेरीत शनिवारी पराभवाचा धक्का बसला. युरोपियन विजेता जेसन क्विग्लेकडून विजेंदरला ०-२ असा पराभव स्वीकारावा लागला. याबरोबरच लंडन ऑलिंपिकनंतर स्पर्धात्मक बॉक्सिंगमध्ये केलेले पुनरागमन विजेंदरला यशस्वी करता आले नाही.
पहिल्या राउंडमध्ये दोघांची २८-२८ बरोबरी झाली होती. मात्र दुस-या राउंडमध्ये २६-३० आणि तिस-या राउंडमध्ये २६-३० असा पराभव विजेंदरला पत्करावा लागला. ‘‘ही लढत मी जिंकणे गरजेचे होते. मात्र या पराभवातून धडा घेईन. त्यातच शेवटच्या तीन मिनिटांत खाली पंच मारल्याबद्दल मला वॉर्निग मिळाली. मात्र जर बाउटची क्षणचित्रे पाहिली तर मी खाली पंच मारले नसल्याचे आढळून येईल. मात्र एक व्यावसायिक बॉक्सर म्हणून या बाबी मान्य करायला हव्यात,’’ असे विजेंदरने म्हटले.
भारताच्या ननाव ठोकचोमने लाइटफ्लायवेट गटाची (४९ किलो) उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने स्कॉटलंडच्या अकील अहमदचा ३-० असा पराभव केला. चुरशीच्या लढतीत ननॉवने ३०-२७, २९-२८, २९-२८ या फरकोने विजय नोंदवले. अन्य बाउटमध्ये ५६ किलो बॅँटमवेट गटातही शिवा थापाने उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने फिलिपिन्सच्या मारियो फर्नाडेझचा ३-० पराभव केला. २९-२८, ३०-२७, २९-२८ या फरकाने शिवाने विजय नोंदवले.
भारतीयांच्या आजच्या लढती
(दुसरी फेरी)
मनदीप जांग्रा (६९ किलो गट) वि. सेडार हुडेबर्डियेव (तुर्कमेनिस्तान)
विकास मलिक (६० किलो गट) वि. डेव्हिड मिशेलस (पोलंड)