सिंचन प्रकल्पांतील गैरव्यवहार उघडकीस आणणारे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे निवृत्तीनंतर आम आदमी पक्षात प्रवेश करणार आहेत.
मुंबई- सिंचन प्रकल्पांतील गैरव्यवहार उघडकीस आणणारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजीनामा द्यायला भाग पाडणारे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे आता राजकारणात प्रवेश करणार आहेत.
येत्या ३० नोव्हेंबरला ते राज्य सरकारच्या सेवेतून निवृत्त होणार आहेत. त्यानंतर ते अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात (आप) प्रवेश करणार असल्याचे पांढरे यांनी सांगितले. ‘आप’च्या महाराष्टर्रातील नेत्यांशी प्राथमिक चर्चा झाली असून पक्षात येण्याचे निमंत्रण दिले असल्याचे पांढरे यांनी सांगितले.