भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीत होणा-या पाच पैकी चार कार्यक्रमांना अखेर निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे.
नवी दिल्ली – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीत होणा-या पाच पैकी चार कार्यक्रमांना अखेर निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे.
मोदींच्या वाराणसीत गुरुवारी दोन सभा होणार होत्या त्यापैकी बेनियाबागमधील सभेला निवडणूक आयोगाने सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारली आहे. मात्र मोदींच्या गंगा आरतीच्या कार्यक्रमाला आयोगाने मंजुरी दिली.
गुरुवारी दुपारी आयोगाने वाराणसातील मोदींच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली होती. आयोगाच्या या निर्णयावर भाजपने जोरदार टीका करत बनारस हिंदू विद्यापीठाबाहेर गुरुवारी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा प्रचाराच्या अखेरच्या दिवशी १० मे रोजी वाराणसीमध्ये रोड शो होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात १२ मे ला वाराणसीमध्ये मतदान होणार आहे. वाराणसीमधून नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेसचे अजय राय आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल निवडणूक लढवत आहेत.