दिल्ली उच्च न्यायालयाने वनप्लस या चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनीला सियानोजेन या ऑपरेटिंग सिस्टीमवरील फोनची विक्री करण्यास केलेली बंदी उठवली आहे.
नवी दिल्ली – दिल्ली उच्च न्यायालयाने वनप्लस या चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनीला सियानोजेन या ऑपरेटिंग सिस्टीमवरील फोनची विक्री करण्यास केलेली बंदी उठवली आहे. यामुळे देशात या कंपनीला फोनची आयात आणि विक्री करता येणार आहे.
या प्रकरणी नव्याने सुनावणी होऊन ती नव्याने हाताळण्याचा निर्णय न्यायालयाने बुधवारी घेतला. ७ जानेवारीला या प्रकरणी नव्याने सुनावणी होणार आहे. या प्रकरणी करण्यात आलेली याचिका रद्द करत असून १६ डिसेंबरला दिलेला निर्णय मागे घेत असल्याचा निकाल न्या. प्रदीप नंद्राजोग आणि आर.के. गौबा यांनी दिला.
वनप्लसने केलेल्या याचिकेवर ही सुनावणी झाली. पेटंटभंगाप्रकरणी नुकतीच श्योमी या आणखी एका कंपनीवर क्वॉलकॉम फोन विक्री करण्यास बंदी घातली होती.