ब-याच काळापासून प्रलंबित असलेले निवृत्तिवेतन विधेयक लोकसभेत बुधवारी मंजूर झाले.
नवी दिल्ली- ब-याच काळापासून प्रलंबित असलेले निवृत्तिवेतन विधेयक लोकसभेत बुधवारी मंजूर झाले. निवृत्तिवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण विधेयक २०११ असे या विधेयकाचे नाव आहे. या विधेयकामध्ये बाजारमूल्यावर आधारित परतावा मिळण्याचे तसेच मोठया प्रमाणात निवृत्तिवेतनात गंतवणूक करण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
स्थायी समितीने सुचवलेल्या बहुतेक सर्व सुधारणा या विधेयकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत, असे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले.
नवीन निवृत्तिवेतन योजना निवृत्त झालेल्या नागरिकांना दीर्घकाळ फायदेशीर ठरणार आहे. ‘कमवतानाच बचत करा’ या सिद्धांतावर हे विधेयक आधारित असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले.