लोकसभेत विरोधी पक्षनेते पद काँग्रेसलाच मिळावे असे मत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी व्यक्त केले केले.
नवी दिल्ली – लोकसभेत विरोधी पक्षनेते पद काँग्रेसलाच मिळावे असे मत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी व्यक्त केले केले.
देशात काँग्रेस हा एकमेव मोठा पक्ष आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद आम्हालाच मिळायला हवे असे सोनिया गांधींनी यावेळी सांगितले. मात्र यासाठी न्यायालयात जाणार की नाही याबाबत त्यांनी काही स्पष्ट केले नाही.
लोकसभेतील पराभव काँग्रेसने अद्याप स्वीकारलेला नाही असे भाजपकडून बोलले जात आहे. मात्र हे विधान सोनिया गांधींनी फेटाळून लावले. हे खोटे आहे. लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला आहे आणि आम्ही तो स्वीकारलेला आहे, असे त्या म्हणाल्या.
सोळाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पहिल्यांदाच बहुमत मिळाले तर काँग्रेसला ४४ जागांवर विजय मिळवता आला. विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्यासाठी ५५ खासदार निवडून येणे गरजेचे असते.