फटाक्यांची लोकलमधून होणारी वाहतूक लक्षात घेऊन प्रवाशांकडे फटाके आढळल्यास पाच हजार रुपये दंड आणि एक ते तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते, अशी ताकीद रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
मुंबई- दिवाळी जवळ आल्यानंतर फटाक्यांची लोकलमधून होणारी वाहतूक लक्षात घेऊन लोहमार्ग पोलिस व रेल्वे पोलिसांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. प्रवाशांकडे फटाके आढळल्यास पाच हजार रुपये दंड आणि एक ते तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते, अशी ताकीद रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
फटाक्यांची घाऊक बाजारपेठ असलेल्या मस्जिद बंदर, कुर्ला, दादर, मालाड येथे फटाके स्वस्त मिळतात. तेथून फटाके घेऊन रेल्वेत बसतात. मात्र, लोकलमधून ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्यास मनाई असतानाही प्रवाशांकडून दिवाळीच्या काळात रेल्वेचे नियम सर्रास धाब्यावर बसवल्याचे दिसून येते. अनेक प्रवासी ज्वलनशील व धोकादायक फटाके सर्रासपणे लोकलमधून ने-आण करत आहेत. मात्र यावेळेस पोलिस हे फटाक्यांची ने-आण करणा-यांवर करडी नजर ठेवणार आहेत. जर एखादा प्रवासी फटाक्यांसमवेत प्रवास करताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे लोहमार्ग रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी ‘प्रहार’शी बोलताना सांगितले.
प्रहार कौल-
[poll id=”810″]
ज्वलनशील पदार्थ लोकलमधून ने-आण करताना एखाद्या प्रवाशाला पकडल्यास त्याला १ ते ३ वर्षाची शिक्षा व रोख रुपये ५ हजार दंड होऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांनी फटाक्यांसमवेत लोकलमधून प्रवास करू नये,असे आवाहन पश्चिम रेल्वे पोलिस आयुक्त आनंद झा यांनी ‘प्रहार’शी बोलताना सांगितले आहे. लोकलमधून फटाक्यांची ने-आण करण्यावर कारवाई केली पाहिजे का? या प्रश्नावर ‘प्रहार’ने प्रवाशांना विचारले असता. लोकलमधून फटाक्यांची ने-आण करणा-यांवर कठोर कारवाई केलीच पाहिजे. आम्ही पोलिसांच्या या निर्णयाचे स्वागत करतो, असे काही प्रवाशांनी सांगितले आहे.