भ्रष्टाचारमुक्तीसाठी महत्त्वाचे मानले जाणारे बहुचर्चित लोकपाल विधेयकावर बुधवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली.
नवी दिल्ली- भ्रष्टाचारमुक्तीसाठी महत्त्वाचे मानले जाणारे बहुचर्चित लोकपाल व लोकायुक्त विधेयकावर बुधवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली.
राज्यसभेने सुधारित केलेल्या लोकपाल विधेयकाला १७ डिसेंबरला आणि त्यानंतर लोकसभेने १८ डिसेंबरला मान्यता दिल्यानंतर हे अतिशय महत्त्वाचे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवले होते.
लोकसभा सचिवालयातून याची प्रत मंगळवारी कायदा विभागात पाठवली होती. त्यानंतर तेथून या विधेयकाची प्रत राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी राष्ट्रपति भवनात पाठवण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी आज या विधेयकावर स्वाक्षरी केल्याचे समजते.