बिहारमधील चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि जगदीश शर्मा यांची खासदारकी रद्द केल्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी मंगळवारी केली.
नवी दिल्ली- बिहारमधील चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि जगदीश शर्मा यांची खासदारकी रद्द केल्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी मंगळवारी केली. लालू सध्या रांचीच्या तुरूंगात शिक्षा भोगत आहेत.
चारा घोटाळा प्रकरणात लालूप्रसाद यादव दोषी ठरले असून त्यांना पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा ठोठावलेल्या आमदार आणि खासदारांचे सदस्यत्व तत्काळ रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी १० जुलै रोजी दिला होता. त्यानुसार लालूप्रसाद आणि जगदीश शर्मा यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.
एमबीबीएस प्रवेश घोटाळा प्रकरणात दोषी ठरलेले माजी राज्यसभा सदस्य रशीद मसूद यांचीही खासदारकी रद्द करण्यात आली होती.
[EPSB]
पाच वर्षे तुरुंगात
चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरलेले राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना रांचीच्या विशेष सीबीआय न्यायालयाने पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.
[/EPSB]