भारताचे पहिले माहिती आणि प्रसारण सचिव व संत साहित्याचे अभ्यासक, भाष्यकार पुरुषोत्तम मंगेश लाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९५८ पासून आकाशवाणीतर्फे प्रतिवर्षी या व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं.
शुक्रवार
लाड स्मृती व्याख्यानमाला
भारताचे पहिले माहिती आणि प्रसारण सचिव व संत साहित्याचे अभ्यासक, भाष्यकार पुरुषोत्तम मंगेश लाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९५८ पासून आकाशवाणीतर्फे प्रतिवर्षी या व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं. डॉ. धनंजय कीर ऊर्फ अनंत विठ्ठल यांनी लोकमान्य टिळक, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधी, वीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान भारतीय व्यक्तित्वांची चरित्रं त्यांनी लिहिली आहेत. अशा आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चरित्रकाराची जन्मशताब्दी या व्याख्यानमालेच्या निमित्ताने साजरी करण्यात येणार आहे. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली ही व्याख्यानमाला संपन्न होणार आहे. ‘डॉ. धनंजय कीर यांचे चरित्रलेखन-समकालीन संदर्भात’ असा या व्याख्यानमालेचा विषय असून, यावर नामवंत प्रकाशक, लेखक आणि संशोधक डॉ. रामदास भटकळ व्याख्यान देणार आहेत.
स्थळ : आकाशवाणी सभागृह, चर्चगेट, मुंबई =वेळ : सायं. ४
मराठा मंदिर वनिता विश्व गौरव पुरस्कार
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मराठा मंदिर आणि वनिता विश्व यांच्यातर्फे मोठय़ा उत्साहाने महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध क्षेत्रांतील मान्यवर महिलांना ‘मराठा मंदिर वनिता विश्व’ या गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला वंदना नवलकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर मराठा मंदिरचे सन्माननीय उपाध्यक्ष चंद्रकांत सावंत समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
स्थळ : श्रीमंत जिवाजीराव शिंदे सभागृह, मराठा मंदिर, दुसरा मजला, मुंबई =वेळ : दुपारी ३.३०
महिला दिनानिमित्त परिषद
आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त आयएमसी (इंडियन मर्चट चेंबर)तर्फे परिषदेचे आयोजन केलं आहे. या परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून न्यायमूर्ती जगदीश वर्मा तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय कायदामंत्री अश्वनी कुमार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय राज्यसभा सदस्य स्मृती इराणी आणि पोलिस कमिशनर सत्यपाल सिंगही पाहुणे वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर दिग्दर्शिका गौरी शिंदे, वकील मृणालिनी देशमुख, महिला आणि बालकल्याणमंत्री वर्षा गायकवाड उपस्थित राहणार आहेत.
स्थळ : क्रिस्टल रूम, हॉटेल ताजमहल पॅलेस, कुलाबा. वेळ : सकाळी ९
लाल देद
या नाटकात कविता, गाणी, विचार आणि मध्ययुगीन काश्मीरमधील कवयित्री लाल देद यांच्या तत्त्वज्ञानाचा मिलाफ घडवण्यात आला आहे. ब्राह्मण माता-पित्यांच्या पोटी जन्मून देखील या मनस्वी कलाकाराने सर्व सीमांच्या पार जाऊन पोहोचण्याच्या ध्येयाने अगदी लहान वयातच आपल्या कपडय़ांचा त्याग करून संपूर्ण आयुष्य अनावृत्तच राहिल्या. त्यांच्या कविता, ज्यांना ‘वाख’ म्हटलं जातं त्यातून त्या काळात भारताला ज्यांनी पांगळं केलं होतं, त्या जाती-पातीच्या शृंखला तोडणा-या निधर्मी मूल्यांचा पुरस्कार केला आहे. लाल देद यांच्याबद्दलच्या सर्व गोष्टींनी-त्यांचे आयुष्य, त्यांच्या वाख यांनी प्रचलित श्रद्धा आणि मतप्रवाह यांना आव्हान दिलं होतं. नाटकाची तिकिटं कार्यक्रमस्थळी मिळतील.
वेळ : संध्याकाळी ७, कालावधी ८० मिनिटं स्थळ : एक्सपेरिमेंटल थिएटर
शनिवार
पंडित तारानाथ राव यांची ९८ वी जयंती
गेल्या शतकातील महान तबलावादक आणि पंडित रवि शंकर यांचे संगीतकार कैलासवासी तारानाथ राव यांची ९८ वी जयंती ९ मार्च रोजी आहे. त्या निमित्ताने त्यांच्या शिष्यवर्गातर्फे शारदा संगीत विद्यालयात संध्याकाळी साडेचारपासून एका मैफलीचे आयोजन केले आहे. त्यात ओंकार गुलवाडी, सदानंद नायाम्पल्ली इत्यादी शिष्यांचे वादन तसेच अशोक बेल्लारे यांचे प्रणव संतूरवादन होणार आहे. सर्व रसिकांसाठी कार्यक्रम खुला आहे. २०१५ साली त्यांच्या जन्मशताब्दीचा मोठा उत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
स्थळ : शारदा संगीत विद्यालय, वांद्रे (पूर्व) वेळ : दुपारी ४.३०
कवितांगण
मराठा सांस्कृतिक मंडळ, गोरेगाव आणि कवितांगणतर्फे वर्धापनदिन आणि कविसंमेलन आयोजित केलं आहे. याच वेळी ‘कवितांगणातील कविता’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध साहित्यिक अशोक बेंडखळे यांच्या हस्ते तर प्रा. कविवर्य प्रकाश खरात यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
स्थळ : मराठा सांस्कृतिक मंडळ गोरेगाव, अण्णाभाऊ साठे मैदान, गोरेगाव वेळ : सायं. व
रविवार
पंडित तळवलकर यांचे एकल वादन
‘सबर्बन म्युझिक सर्कल’ या संस्थेतर्फे रविवारी जुहू येथील शीला रहेजा सभागृहात सुप्रसिद्ध तबलावादक पंडित सुरेश तळवलकर यांच्या एकल तबला वादनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. हार्मोनियमपटू पंडित विश्वनाथ कान्हेरे यांचे एकल वादनही या कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहे. सर्व संगीत रसिकांना हार्दिक आमंत्रण देण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : २६६००८६१
स्थळ : शीला रहेजा सभागृह, जुहू =वेळ : सायं ५
‘काश्मिरी स्पेशल’ महोत्सव
‘एनसपीए’त सध्या ‘काश्मिरी स्पेशल’ महोत्सव भरत आहे. या महोत्सवात ‘शी ऑफ फोअर नेम्स’ हा माहितीपट पाहता येईल. चौदाव्या शतकातील स्त्री संत आणि कवयित्री ‘लाल देद’ या काश्मीरमधील सर्वात महत्त्वाच्या सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. लाल देद यांचा प्रभाव प्रत्येक काश्मिरीवर आहे. माहितीपटात काश्मीरच्या जडणघडणीवरील लाल देद यांच्या प्रभावाचा माहितीपर आढावा घेण्यात आला आहे.
सुरुवातीला कवयित्रीची ओळख करून देण्यात आली आहे आणि काश्मीरमधील जनतेकडे मोर्चा वळवण्यात आला आहे. काश्मिरी लोकांनी लाल देद यांच्याबद्दल केलेल्या हृदयस्पर्शी कथनांमधून, त्यांच्या आयुष्याबद्दलच्या काल्पनिक कथांमधून आणि त्यावर सादर केलेल्या समकालीन थिएटर सादरीकरणातून हे संक्षिप्त माहितीपर-चित्रमय कथन उलगडत जाते. माहितीपटात लाल देद या महान व्यक्तिमत्त्वाच्या विस्तृत जीवनपटावर प्रकाश टाकण्याचा आणि तिच्या प्रभावाबद्दल काश्मिरेतर व्यक्तींना सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रथम येणा-या प्रथम प्राधान्य.
दिग्दर्शक : मिता वशिष्ठ स्थळ : लिटिल थिएटर, एनसीपीए
वेळ : गुरुवार, संध्याकाळी ६.३०