भाजप नेते आणि गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांच्या एका वादग्रस्त व्हिडीओने देशात ‘लव्ह जिहाद’ बाबत खळबळ उडवून दिली आहे.
नवी दिल्ली- भाजप नेते आणि गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांच्या एका वादग्रस्त व्हिडीओने देशात ‘लव्ह जिहाद’ बाबत खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडीओमध्ये आदित्यनाथ यांनी, ‘ तुम्ही एका हिंदु मुलीचे धर्मांतर केल्यास आम्ही १०० मुस्लीम मुलींचे धर्मांतर करू, अशी धमकी दिली आहे.’ मंगळवारपासून हा व्हिडीओ सोशल नेटवर्कवर वा-यासारखा पसरत आहे.
मात्र हा व्हिडीओ जुना असून तो व्हिडीओ कधी आणि कुठे रेकॉर्ड केला, हे अद्याप नेमके स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी काहीही बोलण्यास आदित्यनाथ यांनी नकार दिला. तसेच अशाप्रकारे व्हिडीओ दाखवण्यापूर्वी मिडीयाने शाहनिशा करायला हवी, असे उत्तर दिले.
काय म्हटले आदित्यनाथ यांनी…