आयपीएलमध्ये आर्थिक गरव्यवहाराचा आरोप असलेल्या ललित मोदी याच्याविरोधात ‘रेड कॉर्नर’ नोटीस काढण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
नवी दिल्ली – आयपीएलमध्ये आर्थिक गरव्यवहाराचा आरोप असलेल्या ललित मोदी याच्याविरोधात ‘रेड कॉर्नर’ नोटीस काढण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
भारतीय तपास संस्था सीबीआयने गुरुवारी या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे ‘इंटरपोल’ला पाठवली असून त्याआधी या कागदपत्रांची तपासणी आणि कायदेशीर छाननी करण्यात आली आहे.
अंमलबजावणी संचलनालयाला हव्या असलेल्या मोदीला पकडण्यात या ‘इंटरपोल’च्या ‘रेड कॉर्नर’ नोटीसमुळे मदत होणार आहे. मुंबई येथील अंमलबजावणी संचलनालयाच्या शाखेने सीबीआयला ललित मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्यासाठी विनंती करण्याची मागणी केली होती. ललित मोदीविरोधात नुकतेच विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटही बजावले आहे.