हिमाचलप्रदेशमध्ये मंगळवारी सकाळी विवाहसोहळयाच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात आठ जण ठार झाले असून, १४ जण जखमी झाले आहेत.
चंबा – हिमाचलप्रदेशमध्ये मंगळवारी सकाळी विवाहसोहळयाच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात आठ जण ठार झाले असून, १४ जण जखमी झाले आहेत.
चंबा जिल्ह्यातील सलूनी तालुक्यातील बाकुरा जवळ हा अपघात झाला. एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन २५० फूट खोल दरीत कोसळले. अपघाताचे ठिकाण दुर्गम भागात आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले होते. जखमींना चंबा जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे. मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले असून, जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्तांना सर्व प्रकारची मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.