चंदीगडमधील सेक्टर ४५ मध्ये शनिवारी सकाळी लक्झरी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू तर १५ जण जखमी झाले.
चंदीगड – चंदीगडमधील सेक्टर ४५ मध्ये शनिवारी सकाळी लक्झरी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू तर १५ जण जखमी झाले.
हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथून ही बस नवी दिल्लीच्या दिशेने निघाली होती. यावेळी समोरुन येणा-या कारला या बसची धडक बसली. अपघात घडला तेव्हा दोन्ही वाहने भरधाव वेगात होती. या अपघातात कारमधील तीन तर बसमधील दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
जखमींना सेक्टर ३२ मधील सरकारी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.