रेल्वेचे डबे बनवणारी देशातील सर्वात जुनी कंपनी ‘जेसॉप अॅँड कंपनी’ने कायमस्वरूपी बंद करण्याची परवानगी सरकारकडे मागितली आहे.
कोलकाता – रेल्वेचे डबे बनवणारी देशातील सर्वात जुनी कंपनी ‘जेसॉप अॅँड कंपनी’ने कायमस्वरूपी बंद करण्याची परवानगी सरकारकडे मागितली आहे. मात्र, पश्चिम बंगाल सरकारने या निर्णयाला विरोध केला.
कंपनीचा डमडम येथील कारखाना कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कामगार खात्याकडे परवानगी मागितली आहे. याची एक प्रत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठवली आहे. कंपनीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घटले असून ६०० कामगारांच्या वेतनासाठी दरमहा २ कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. कंपनी बंद करण्यासाठी ६० दिवसांची नोटिस आवश्यक आहे.
मात्र कंपनी केवळ १५ दिवसांची नोटिस देऊन कारखाना बंद करीत आहे. कंपनीकडे मोठय़ा प्रमाणावर ऑर्डर आहेत. त्यामुळे हा कारखाना बंद करण्याची परवानगी देणार नाही, असे बंगालचे कामगारमंत्री पुणेंद्रू बोस यांनी सांगितले.