रॅफेल या फ्रान्सच्या लढाऊ विमानांच्या खरेदीतील बहुतेक अडचणी आता संपल्या असून रखडलेली खरेदी प्रक्रिया लवकरच अंतिम टप्प्यात येणार आहे.
नवी दिल्ली- रॅफेल या फ्रान्सच्या लढाऊ विमानांच्या खरेदीतील बहुतेक अडचणी आता संपल्या असून रखडलेली खरेदी प्रक्रिया लवकरच अंतिम टप्प्यात येणार आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या संरक्षण खरेदी समितीच्या (डीएसी) बैठकीत उर्वरित अडथळ्यांचा आढावा घेतला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
रॅफेल खरेदी प्रक्रियेतील काही बाबी स्पषट होणे गरजेचे असून संरक्षण खरेदी समितीच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा केली जाईल. त्यांनतर ही प्रक्रिया लवकरच संपण्याची शक्यता आहे, संरक्षण मंत्री राव इंद्रजित सिंग यांनी सांगितले. फ्रान्स आणि भारतामध्ये मागील एक वर्षापासून रॅफेल या लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत चर्चा सुरू आहे.
मागील जानेवारी महिन्यात फ्रेंच राष्ट्राध्यक्ष फ्रॅकॉईस हॉलंड भारतभेटीवर आले होते. यावेळी ३४ रॅफेलच्या खरेदीसंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला होता.
रॅफेल या लढाऊ विमानांच्या खरेदीसंदर्भात फ्रान्स व भारतामध्ये गेल्या सुमारे एक वर्षापासून चर्चा सुरु आहे. गेल्या जानेवारी महिन्यात फ्रेंच राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकॉईस हॉलंड यांच्या भारतभेटीदरम्यान ३४ रॅफेलच्या खरेदीसंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला होता.