मुंबई – डॉक्सअॅप चॅट किंवा कॉलच्या माध्यमातून रुग्णांना डॉक्टरांशी जोडणारे भारताचे सर्वात मोठे ऑनलाइन हॉस्पिटल बनले आहे. दररोज १,२०० हून अधिक लोक या अॅपवर ऑनलाइन स्पेशालिस्ट डॉक्टर्सचा सल्ला प्राप्त करतात. भारतात उत्तमरित्या स्थापित झालेले एक ऑफलाइन खासगी हॉस्पिटल दररोज जवळपास १,००० व्यक्तींना सल्ला सुविधा देते. डॉक्सअॅप त्याच्या अनोख्या ऑफ रिंग्जसह हेल्थकेअर क्षेत्रामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणत आहे.
सध्याचा विकास दर पाहता, अॅप २०१८ पर्यंत सर्व ऑफलाइन हॉस्पिटल श्रंखलांपेक्षा अधिक रुग्णांना सेवा देण्यामध्ये सक्षम ठरेल. डॉक्सअॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक, सतिश कन्नन म्हणाले, गायनाकॉलॉजी, पेडिएट्रिक्स, डर्मर्टोलॉजी, मधुमेहमधील प्राथमिक हेल्थककेअरसाठी वाजवी दरातील सल्ल्यांपासून कार्डियक, संधिवात व कर्करोगावरील दुसरे मत देण्यापर्यंत, डॉक्सअॅप जनतेसाठी भौगोलिक क्षेत्रांमध्ये दर्जात्मक वैद्यकीय सल्लामसलतीची सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये यशस्वी ठरला आहे. डॉक्सअॅपवरील डॉक्टर्स हे अव्व्ल शहरांमधील एचडी स्पेशालिस्ट डॉक्टर्स आहेत. ४.३ इतक्या सर्वाधिक युजर रेटिंगसह, डॉक्सअॅप ७ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सातत्याने गुगल प्लेप स्टोअरवरील वैद्यकीय विभागा मध्ये पहिल्या क्रमांकाचे अॅप ठरले आहे.