काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी आज मंगळवार दि. १२ एप्रिल रोजी मुंबईत येत आहेत.
मुंबई- काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी आज मंगळवार दि. १२ एप्रिल रोजी मुंबईत येत आहेत. आगीने धुमसणा-या देवनार डम्पिंग ग्राऊंडला ते भेट देऊन तेथील जनतेचे प्रश्न ते समजावून घेणार आहेत. सकाळी ११ वाजता ते देवनार डम्पिंग ग्राऊंडला भेट देतील.
गेली अनेक दिवस सुरू असलेल्या संपानिमित्त राहुल गांधी हे झवेरी बाजारात जाऊन सराफांची भेट घेणार आहेत. त्यांच्या समस्या ते जाणून घेणार आहेत.
नागपूर येथील सभेत सराफा आंदोलनाचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी मंगळवारी मुंबई भेटीत आपण त्यांच्या बाजूने उभे राहू, असे जाहीर केले.