दिल्लीतील विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनचे संचालक अजित दोवल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्त करण्यात आली आहे.
नवी दिल्ली– गुप्तचार विभागाचे(‘इंटेलिजन्स ब्युरो’) माजी प्रमुख आणि सध्या दिल्लीतील विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनचे संचालक अजित दोवल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्त करण्यात आली आहे.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने विविध महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्या सुरु केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच नृपन्द्र मिश्रा यांची पंतप्रधानांच्या प्रधान सचिव पदी नियुक्त केली होती. तर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांची महान्यायवादी म्हणून नेमणूक करण्यात आली होती.