आम आदमी पक्षाच्या राजकारणात शनिवारचा दिवस चांगलाच वादग्रस्त ठरला.
नवी दिल्ली – आम आदमी पक्षाच्या राजकारणात शनिवारचा दिवस चांगलाच वादग्रस्त ठरला. प्रचंड गदारोळ, जोरदार घोषणाबाजी, निदर्शनानंतर सुरु झालेल्या आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, आनंद कुमार आणि अजित झा यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी ४५ मिनिटांचे भाषण केले. या भाषणाचा व्हिडीओ “आप’ने यूट्यूबवर प्रसिद्ध केला आहे. केजरीवाल भाषण झाल्यानंतर तात्काळ बैठकीतून निघून गेले. त्यानंतर या नेत्यांच्या हकालपट्टीच्या प्रस्तावावर मतदान झाले. यामध्ये प्रस्तावास बहुमताने पाठिंबा मिळाल्याने या चौघांची राष्ट्रीय कार्य़कारिणीतून हकालपट्टी करण्यात आली.
बैठकीपूर्वी मोठा गदारोळ झाल्याने केजरीवाल भाषण झाल्यानंतर तात्काळ बैठकीतून निघून गेले. त्यानंतर या नेत्यांच्या हकालपट्टीच्या प्रस्तावावर मतदान झाले. यामध्ये प्रस्तावास बहुमताने पाठिंबा मिळाल्याने या चौघांची राष्ट्रीय कार्य़कारिणीतून हकालपट्टी करण्यात आली.
दरम्यान, बैठकीत लोकशाहीची हत्या झाल्याचा आरोप योगेंद्र यादव यांनी केला.