स्वयंघोषित आध्यात्मिक धर्मगुरू राधे माँ चा अटकपूर्व जामीन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावला.
मुंबई- स्वयंघोषित आध्यात्मिक धर्मगुरू राधे माँ चा अटकपूर्व जामीन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावला आहे.
कांदिवलीत परिसरातील निक्की गुप्ता या महिलेने तिच्या सासरच्या सहा जणांसह राधे माँ यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी शोषण केल्याची तक्रार केली आहे. कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी छळ प्रकरणी तिच्या पतीची कांदिवली पोलिसांनी नुकतीच जबानी नोंदवून घेतली आहे. या प्रकरणात राधे माँ यांची शुक्रवारी पोलीस चौकशी करणार आहेत.
मुंबई पोलिसांकडून सहा जणांना समन्स बजावण्यात आले आहेत. यात राधे माँचा समावेश नाही. मात्र सहा जणांची चौकशी झाल्यानंतर पोलीस राधे माँच्या नावे समन्स बजावून चौकशी करणार आहेत.
राधे माँच्या सांगण्यावरुन सासरची मंडळी छळ करत असल्याचे निक्की गुप्ता या महिलेने म्हटले आहे. याप्रकरणी राधे माँ ला उद्या शुक्रवारी पोलिसांपुढे जबाब नोंदवण्यास जावे लागणार आहे.
त्याआधी राधे माँ चा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असल्याने आवश्यकता वाटल्यास मुंबई पोलीस राधे माँला अटक करण्याची शक्यता आहे.
[EPSB]
‘राधे माँ’ म्हणते, ती निर्दोष
कांदिवलीतील एका विवाहित महिलेच्या तक्रारीवरून तिच्या पतीची कांदिवली पोलिसांनी सोमवारी जबानी नोंदवून घेतली आहे.
राधे माँविरोधात डॉली बिंद्राची तक्रार
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप असलेल्या राधे माँच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे.
‘राधे माँ’चे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल
प्रसारमाध्यमांमध्ये सध्या चर्चेत असलेल्या स्वयंघोषित गुरु राधे माँ यांचे सोशल मिडियावर काही फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.
[/EPSB]