प्राथमिक आरोग्य केंद्रांची जबाबदारी संभाळत असलेल्या रायगड जिल्हा परिषदेने या रुग्णालयांत काम करणा-या डॉक्टरांचे मासिक पगार सप्टेंबर महिन्यापासून थकवले आहेत.
नेरळ- रायगड जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयांवर आहे. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रांची जबाबदारी संभाळत असलेल्या रायगड जिल्हा परिषदेने या रुग्णालयांत काम करणा-या डॉक्टरांचे मासिक पगार सप्टेंबर महिन्यापासून थकवले आहेत. त्यामुळे जानेवारी महिन्यापर्यंत पगार न दिल्यास १८ जानेवारीला होणा-या ‘पल्स पोलिओ कार्यक्रमा’वर बहिष्कार टाकू, असा डोस महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी गट ‘अ’च्या जिल्हा कमिटीने जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे.
ग्रामीण रुग्णालये प्रत्येक तालुक्यात आहेत. सोबतच उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयेही आहेत. या संपूर्ण रुग्णालयांचे नियोजन राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचे उपसंचालकांकडे असते. थेट गावपातळीवर जाऊन आरोग्य सेवा देण्याचे काम जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून होत असते. यासाठी रायगड जिल्हा परिषदेची संपूर्ण ह्यिलत १५ तालुक्यांत ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या आरोग्य केंद्रांत प्रत्येकी पाच-सहाच्या संख्येने उपकेंद्रे आहेत. अशाप्रकारे आरोग्य सेवा संभाळण्याचे काम करणा-या जिल्हा परिषद यंत्रणेकडे ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रांत सध्या १०२ डॉक्टर काम करत आहेत. काही ठिकाणी डॉक्टरांची पदे रिक्त आहेत.
आरोग्य सेवा हीच आपली जबाबदारी समजून दिवसरात्र झटणा-या या डॉक्टरांना गेल्या तीन महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. त्यामुळे राज्य राजपत्रित अधिकारी वर्ग ‘अ’च्या रायगड जिल्हा संघटनेने याबाबत कडक भूमिका घेतली आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. जगनाथ पाटील यांनी जिल्हा परिषदेने तात्काळ डॉक्टरांचे पगार काढावेत; अन्यथा ह्यिलतील सर्व ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील डॉक्टर जानेवारी महिन्यात देशपातळीवर होणा-या ‘पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे’वर बहिष्कार टाकतील, असा लेखी इशारा दिला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांत डॉक्टर म्हणून काम करणा-या सर्वाच्या पगाराची रक्कम सरकारकडून जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाकडे आली आहे. मात्र कार्यवाही करणारे लेखा विभागातील कर्मचारी नवीन असल्याने त्यांनी रिपोìटग केलेली कागदपत्रे ट्रेझरीत जुळून येत नसल्याने मागील दोन महिने हा गोंधळ सुरू आहे. मात्र थकित पगार डिसेंबर महिन्यात देण्याची कार्यवाही पूर्ण होईल. – डॉ. हुकूमचंद्र पाटोले, जिल्हा आरोग्य अधिकारी
आम्ही कुरबूर न करता दोन-अडीच महिने काम करत आहोत. या काळात पगार मिळाला नसल्याने दुस-यांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. – डॉ. सचिन गोमसाले, संघटना सचिव