राज्य निवडणूक आयुक्त या पदावरील नियुक्तीसाठी निवृत्त मुख्य सचिव ज. स. सहारिया यांची शिफारस करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मुंबई : राज्य निवडणूक आयुक्त या पदावरील नियुक्तीसाठी निवृत्त मुख्य सचिव ज. स. सहारिया यांची शिफारस करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
नीला सत्यनारायण यांचा ५ वर्षाचा कार्यकाळ ४ जुलै २०१४ला संपुष्टात आला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते. या पदावर आता सहारीया यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. ज. स. सहारीया हे नुकतेच राज्याचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या नावाची शिफारस केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.