१६ सुवर्ण, १४ रौप्य, ११ कांस्यपदके
मुंबई – बालेवाडीतील (पुणे) श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात झालेल्या ३१व्या एएसकेएम कॅडेट, ज्युनिअर, सीनियर महाराष्ट्र राज्य किकबॉक्सिंग स्पर्धेत शितो रियू स्पोर्ट्स कराटे अँड किकबॉक्सिंग असोसिएशनच्या ( एसएसकेकेए) खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत १६ सुवर्णासह १४ रौप्य आणि ११ कांस्य अशी एकूण ४१ पदके पटकावली.
सदर खेळाडू भारतरत्न राजीव गांधी क्रीडा संकुल (धारावी), अवर लेडी ऑफ गुड काउंसिल हायस्कूल (सायन), ओ. एल. पी. एस हायस्कूल (चेंबूर), पी. डब्लू. एस. हायस्कूलमध्ये (सायन) येथे प्रशिक्षक उमेश ग. मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली किकबॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. सुवर्ण व रौप्य पदक विजेते खेळाडू ६ ते १० सप्टेंबर २०१७ दरम्यान रायपूरमध्ये (छत्तीसगड) होणा-या कॅडेट, ज्युनियर, सीनियर वाको इंडिया राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.
सुवर्णपदक विजेते
सरिता जैसवार (दोन सुवर्ण), अभिजीत पटेल (दोन सुवर्ण), प्रीती शेट्टी, तेजल बेडमुथा, रोशन शेट्टी, विघ्नेश मुरकर, दक्ष शेट्टी, साधना सांगवी, बालाचंदर मार्क, अभिषेक जैसवार, आर्या गुलदेकर, एस्तर पी., यशराज शर्मा, संतोष गुलदेकर.
रौप्यपदक विजेते
लॅबिन जेम्स (दोन रौप्य), अथेवीव लाड, प्रिया शेट्टी, शॉन करकडा , प्रज्वल खांदारे, तेजल बेडमुथा, साधना सांगवी, राहुल साळुंखे, महेंद्रराज नाडर, विघ्नेश मुरकर, श्रेया गुलदेकर, प्रीती शेट्टी, नीतीका विश्वकर्मा.
कांस्यपदक विजेते
वैभव रटाटे (दोन कांस्य), रोशन शेट्टी, साप्रती पाटील, प्रज्वल खांदारे, ओम साळवी, श्रेयश साहा, राहुल साळुंखे, श्रेया गुलदेकर, सलोमी सुलोमन, यशराज शर्मा.