अमेठीत राहुल गांधी यांच्याविरोधात कोणत्या उमेदवाराला निवडणुकीत रिंगणात उतरवायचे, यावर भाजपमध्ये अनेक महिने मतैक्य होत नव्हते. अमेठीत काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी केलेल्या कामाचा आवाका फार मोठा आहे. म्हणून त्यांच्याविरोधातील उमेदवाराचा पराभव हा पक्का समजला जात आहे. अशातच हो-नाही करत भाजपने राज्यसभा सदस्य आणि भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष स्मृती इराणी यांच्या नावाची घोषणा केली. ही घोषणा होण्याआधी काही दिवस इराणी यांच्या नावाची घोषणा अमेठीसाठी केली जाणार असल्याचे प्रसिद्धीमाध्यमे सांगू लागले होते. स्मृती इराणी यांना या गोष्टीची कुणकुण लागताच मला लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही; मात्र, पक्षाने जबाबदारी दिली तर मी निवडणूक लढवेन, असा सावध पवित्रा घेतला होता. कारण त्या स्वत:च अमेठीतून निवडणूक लढवायला उत्सुक नव्हत्या. समोर पराभव दिसत असताना केवळ राजकीय बळी बनायला स्मृती इराणी यांना आवडणार नाही, हे खरे आहे. मात्र, आता पक्षाने त्यांच्या नावाची घोषणा करताच उसने अवसान घेत मी निवडणूक लढवायला इच्छुक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशाचा विकास भाजपनेच कसा केला आहे, अशी जाहिरातबाजी करत भाजपने इंडिया शायनिंगचा नारा दिला आणि २००४ची लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यात त्यांचा दारुण पराभव झाला. त्याच इंडिया शायनिंगच्या पार्श्वभूमीवर २००३मध्ये टीव्ही मालिकेत लोकप्रिय बहू ठरलेल्या स्मृती इराणी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या दिल्लीच्या त्यांच्या घरच्या मैदानात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिबल यांच्या विरोधात निवडणूक लढल्या. मात्र, लोकप्रिय ‘बहू’ला लोकांना फक्त पडद्यावरच पाहायला आवडते ते त्यांना पराभवानंतर कळून चुकले. लोकांना बहूच्या मालिका पाहायला आवडल्या; पण, बहूच्या क्षमतेबद्दल शाश्वती नसलेल्या दिल्लीकरांनी त्यांना नाकारले. प्रसारमाध्यमांतून त्यांच्या पराभवाबद्दल प्रश्न विचारले गेले असता मी येथे पक्षाचे काम करायला आले आहे. पण, त्यामुळे विजय-पराजय हा त्यातील एक भाग आहे, असे स्पष्ट करत त्यांनी झाल्या गोष्टीबद्दल फार बोलणे टाळले. नाराज झालेल्या इराणी यांच्याकडे मग टप्प्याटप्प्याने इतर अनेक जबाबदा-या सोपवण्यात आल्या. त्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बनल्या. आता त्या गुजरातमधून राज्यसभा सदस्य आहेत व भाजपच्या उपाध्यक्षही आहेत. लोकप्रियतेचा आणि निवडून येण्याचा काही संबंध नसतो, हे त्यांना २००४लाच कळून चुकले आहे. या लोकसभा निवडणुकीत आपल्याला दिल्लीतूनच उमेदवारी मिळेल, अशी त्यांना आशा होती. मात्र, त्यांना अमेठीतून मिळाल्यामुळे या निवडणुकीतही आपला पराभव ठरलेला आहे, हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यातच ‘आप’चे नेते कुमार विश्वासही अमेठीतून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे स्मृती इराणी यांची थेट लढत राहुल गांधी यांच्याबरोबर होणार नाही. दिल्लीकरांनी २००४मध्ये या पडद्यावरच्या बहूला नाकारले होते आणि आता अमेठीकरही तेच करतील.
राजकीय बळी
RELATED ARTICLES
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on