राक्षस या मराठी चित्रपटाचा जबरदस्त, टीजर लाँच करण्यात आला आहे.
‘नवलखा आर्टस अँड होली बेसिल कम्बाइन’चे विवेक कजारिया आणि नीलेश नवलखा निर्मित समित कक्कड यांची ‘समित कक्कड फिल्म्स’ प्रस्तुत आणि ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित ‘राक्षस’ हा चित्रपट आहे.
सई ताम्हणकर आणि शरद केळकर ही जोडी राक्षसच्या निमित्ताने एकत्र बघायला मिळणार आहे. ज्ञानेश झोटिंग यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
चित्रपटात ऋजुता देशपांडे, दयाशंकर पांडय़े, विजय मौर्य, याकूब सैद, वांदेकर आदींच्या भूमिका आहेत. २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना कळणार आहे.