योगा आणि सूर्यनमस्काराला विरोध करणा-यांनी भारत देश सोडावा नाहीतर समुद्रात उडी मारावी असे वादग्रस्त विधान भाजपाचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा केले आहे.
वाराणसी – वारंवार समज देऊनही भाजपा खासदारांची मुक्ताफळे उधळणे काही संपत नाही. योगा आणि सूर्यनमस्काराला विरोध करणा-यांनी भारत देश सोडावा नाहीतर समुद्रात उडी मारावी असे वादग्रस्त विधान भाजपाचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणीसीतील एका मंदिरातील सोहळ्यात ते बोलत होते. योगासनात सूर्यनमस्काराला सर्वश्रेष्ठ आसन मानले जाते. सूर्यनमस्कार हा योगाचा महत्त्वाचा भाग आहे ज्यामुळे मन शुद्ध होते. ज्यांचा सूर्यनमस्काराला विरोध आहे अशा लोकांनी एकतर अंधा-या खोलीत जीवन व्यतीत करावे अथवा समुद्रात उडी घ्यावी असे योगनाथ म्हणाले.
४० मुस्लिम देशांचा समावेश असलेले जगातील १०० हून अधिक देशाला २१ जून रोजी योगदिनाला पाठिंबा देत आहेत. जर त्यांना काही हरकत नाही तर भारतीय मुस्लिम याला विरोध का करत आहेत. असा सवालही त्यांनी यावेळी केला.