मुंबईत १९९३मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला गुरुवारी सकाळी अखेर फासावर लटकावण्यात आले.
नागपूर – मुंबईत १९९३मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला गुरुवारी सकाळी अखेर फासावर लटकावण्यात आले. त्याच्या वाढदिवशी म्हणजेच आज अखेर त्याला फाशी देण्यात आली. अखेर २२ वर्षांनी स्फोटात निष्पाप बळी गेलेल्यांना न्याय मिळाला.
याकूबला त्याच्या वाढदिवसादिवशीच फाशी देण्यात आली. त्याच्या वाढदिवसानिमित्त नागपूर मध्यवर्ती कारागृहात त्याच्यासाठी केकही पाठवण्यात आला होता. मेमनच्या कुटुंबियांनी हा केक तुरुंग अधीक्षकांकडे दिला. त्याचा हा ५३ वा वाढदिवस होता.
याकूबने आपल्या बचावासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. सर्वोच्च न्यायालयात मध्यरात्री याकूबच्या याचिकेवर सुनावणी सुरु होती.
तीन वाजून २० मिनिटांनी ही सुनावणी सुरु झाली. दीड तासांच्या सुनावणीनंतर याकूबने दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आणि याकूबचा बचावाचा अखेरचा मार्गही संपला. सकाळी सहा वाजून २० मिनिटांनी त्याला फासावर लटकवण्यात आले.