१९९३ बॉम्बस्फोट प्रकरणी ५३ वर्षीय दोषी याकूब मेमनला गुरुवारी सकाळी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली
नागपूर- १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणी ५३ वर्षीय दोषी याकूब मेमनला गुरुवारी सकाळी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फाशी देण्यापूर्वी याकूबने मुलीला भेटण्याची अंतिम इच्छा व्यक्त केली होती.
नियमानुसार, फाशी दिल्या जाणा-या व्यक्तीला फाशी देण्यापूर्वी त्याची अंतिम इच्छा विचारली जाते. त्यानुसार याकूबला अंतिम इच्छा विचारण्यात आली होती. याकूबने आपल्या मुलीला भेटण्याची इच्छा प्रशासनाकडे व्यक्त केली होती.
तुरुंग प्रशासनानेही फोनवरुन याकूबचे त्याच्या मुलीशी बोलणे घडवून आणले आणि त्याची इच्छा पूर्ण केली.